loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग महावितरण कार्यालयात ग्राहकांचा संताप; वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांचा रोष, तहसीलदार घटनास्थळी दाखल

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी आज दोडामार्ग महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक कार्यालयात जमले असून, अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदारही घटनास्थळी दाखल झाले. सततच्या वीज खंडित होण्यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक भागांत तासन्तास वीज नसल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरगुती कामांसह व्यावसायिक व्यवहारांवरही त्याचा परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महावितरण कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान संतप्त ग्राहकांनी वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांची माहिती मागितली. तसेच तातडीने सुरळीत वीजपुरवठा सुरू करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला. दरम्यान, तहसीलदारांनी घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांची बाजू जाणून घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती मिळाली. नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक समन्वय साधला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टाईम्स स्पेशल

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले असून, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, आता महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg