loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील पहिले AI-आधारित LMS विद्यार्थ्यांच्या सेवेत; आयसीएस महाविद्यालयात ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन

खेड, (प्रतिनिधी) : सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खेड (रत्नागिरी) तसेच हिराचंद पर्शुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन विभागाच्या वतीने अत्याधुनिक Learning Management System (LMS) या ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय हिराचंद पर्शुराम बुटाला यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजया सचिन भोसले यांनी केले. यावेळी LMS प्रणाली विकसित करणाऱ्या झुबेल AI कंपनीचे ज्ञानेश्वर बडगुजर व पवन बडगुजर, तसेच दृष्टी टेलनेटचे शितलकुमार इंदे व प्रशांत बेडेकर यांचे स्वागत करण्यात आले. या संकल्पनेला मार्गदर्शन करणारे डॉ. हिरेन दंड, डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. तुषार साबारे यांचे विशेष आभार मानण्यात आले. या प्रणालीसाठी प्रेरणा व पाठबळ देणारे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, विलासभाई बुटाला, महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, विभागाचे चेअरमन अमोलभाई बुटाला, मितेशभाई बुटाला, सुरेश खेडेकर, उत्तम कुमार जैन तसेच संचालक मंडळाचेही स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. अनिता आवटे, डॉ. राजेंद्र भालेराव, डॉ सचिन भोसले आणि सजेली बुटाला यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. विजया भोसले यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लक्षात घेऊन ही LMS प्रणाली विकसित करण्यात आली असून ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीला ती पूरक ठरणार आहे. या प्रणालीमध्ये ॲडमिन, स्टाफ आणि विद्यार्थी असे तीन स्वतंत्र घटक कार्यरत राहतील. विषयशिक्षकांना प्रथम अभ्यासक्रम व तासिकांचे नियोजन दिल्यानंतर ते व्हिडिओ लेक्चर तयार करतील. ॲडमिनच्या मंजुरीनंतरच विद्यार्थ्यांना ते लेक्चर उपलब्ध होईल. प्रत्येक व्हिडिओसाठी AI-आधारित नोट्स, सारांश आणि क्विझ तयार होईल. सर्व क्विझमधील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र (Certificate) प्रदान केले जाईल. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ प्रत्यक्ष पाहावा यासाठी AI Motion Detection सुविधा देण्यात आली असून, ५ ते ७ मिनिटे कोणतीही हालचाल आढळली नाही तर व्हिडिओ आपोआप बंद होईल. भविष्यात या प्लॅटफॉर्मवर एमबीए, बारावी, करिअर मार्गदर्शन, UPSC, MPSC यांसारख्या विविध अभ्यासक्रमांचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच इतर महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनाही या प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्कात दर्जेदार डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेली ही प्रणाली कोकणातील अशा प्रकारची पहिली AI-आधारित LMS प्रणाली असल्याचे सांगण्यात आले. आजपासून हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला असून त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. "या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी शेट यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नेहा पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg