loader
Breaking News
Breaking News
Foto

नीट पेपरफुटीमुळे लाखों विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला, वैभववाडीत सर्वपक्षिय पदाधिकार्‍यांकडून तहसिलदारांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी): नीटसह देशातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होणारे गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अपारदर्शकतेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी वैभववाडीतील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून अहोरात्र मेहनत करून परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे पाणी फेरले जात आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अत्यंत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यात केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या शांततामय आंदोलनालाही या निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. प्रमुख मागण्या: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा. नीट व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पेपरफुटी व गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. राष्ट्रीय परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी तातडीने प्रभावी सुधारणा लागू कराव्यात. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करून त्यांच्या भविष्याशी असा खेळ पुन्हा होणार नाही, याची शासनाने लेखी हमी द्यावी.

टाईम्स स्पेशल

या यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नंदकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन तावडे, आणि काँग्रेसचे दादा नेवरेकर यांच्यासह गुलजार काझी, स्वप्निल रावराणे, रुपेश वारंग, दिव्या पाचकुडे, मनोज सावंत, दिलीप राणे, विनोद विटेकर, उमाकांत राणे, अहमद बोबडे, यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg