loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणच्या मनिष काणेकर यांची टेनिक्वाईट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या तांत्रिक समितीत निवड

चिपळूण:- टेनिक्वाईट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आगामी २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. पुणे येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण सभेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे क्रीडा संघटक मनिष महादेव काणेकर यांची राज्याच्या तांत्रिक समितीमध्ये सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि वार्षिक सभा असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व जनरल सेक्रेटरी अनिल वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडली. मनिष काणेकर यांनी यापूर्वी टेनिक्वाईट खेळाच्या प्रसारासाठी ग्रामीण व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या या अनुभवाची दखल घेत त्यांना राज्य पातळीवरील तांत्रिक समितीत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळातून आनंद व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg