loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी मजगांव येथील आदिल इबजींचा जागतिक सन्मान

R atnagiri Times : रत्नागिरी मजगांव येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावत संपूर्ण कोकणाला अभिमानाची गोष्ट दिली आहे. रत्नागिरी मजगांव येथील आदिल अब्दुल मजीद इबजी यांनी स्कॉटलंड येथील जगप्रसिद्ध हेरियट-वॉट विद्यापीठातून "Master of Science in International Business Management with Finance" ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.विद्यापीठाच्या सिनेटच्या ठरावानुसार ५ जुलै २०२६ रोजी त्यांना ही पदवी अधिकृतरित्या प्रदान करण्यात आली. या प्रमाणपत्रावर विद्यापीठाचे कुलगुरू, स्कूल ऑफ सोशल सायन्सेसचे कार्यकारी अधिष्ठाता आणि विद्यापीठ सचिव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१८२१ साली स्थापन झालेले हेरियट-वॉट विद्यापीठ हे युनायटेड किंगडमधील ८व्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ आहे. व्यवसाय, वित्त, अभियांत्रिकी आणि डेटा सायन्स या क्षेत्रात या विद्यापीठाचे पदवीधर जगभरातील टॉप कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.आदिल यांनी निवडलेला "International Business Management with Finance" हा अभ्यासक्रम जागतिक व्यापार धोरणे, गुंतवणूक व्यवस्थापन, आर्थिक विश्लेषण आणि क्रॉस-कल्चरल लीडरशिप यावर आधारित आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळते.आदिल यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कतार येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मलेशिया येथील हेरियट-वॉट सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळवला असे , आदिल म्हणाले. " सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांला एवढ्या प्रतिष्ठीत विद्यापीठात शिक्षण घेणे सोपे नव्हते. पण पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे शक्य झाले. परदेशात शिकताना वेगवेगळ्या देशांतील विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर व्यावहारिक अनुभवही मिळाला."आदिल यांच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे वडील अब्दुल मजीद इबजी आणि आई कैरसबेगम यांनी सांगितले, "आम्हाला आमच्या मुलाचा खूप अभिमान आहे. त्याने आमचे तसेच आमच्या गांवाचे नांव उज्ज्वल केले. इतर विद्यार्थ्यांनीही त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

"कोकणातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत" - आदिल

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg