loader
Breaking News
Breaking News
Foto

पेडणेकर विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे विद्यार्थी गुणगौरव उत्साहात पार पडला. कार्यक्रमात इ. 10 वी परीक्षा तसेच विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था, मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. रमेश कदम लांजा पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर, तळवडे ग्रामपंचायतच्या सरपंच रोहिणी आंबेकर, स्थानिक कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटोळे, शाळा समिती चेअरमन कॅ. नामदेव पाटोळे, स्थानिक संस्थेचे सहकार्यवाह नंदकुमार आंबेकर, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, मुंबई संस्थेचे माजी सदस्य गणपत कदम, स्थानिक संस्था कोषाध्यक्ष सुधाकर पाटोळे, सदस्य महंमद पावसकर, सुजित आंबेकर, स्वाती कदम, शाळा समिती सदस्य विजय पाटोळे, नारायण कदम, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक भीमराव खोत, माजी शिक्षक बाळासाहेब आवटे, माजी शिक्षक प्रभाकर सनगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर यांनी केले. त्यांनी प्रशालेचे जिल्हास्तर स्वच्छ व हरित विद्यालय पंचतारांकित मानांकन यश, प्रशालेच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमधील विद्यार्थ्यांचे यश तसेच शैक्षणिक उठाव करण्यासाठी सहकार्य केलेल्या व्यक्ती व संस्था यांची माहिती दिली. त्यानंतर दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त लतिका भूषण सावंत, (९५.००%), द्वितीय कस्तुरी मेस्त्री (९४.८०%), तृतीय दिपराज इंगळे (८४.२०%) यांसह दहावीतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सुजित आंबेकर यांनी दोन हजार रुपये बक्षीस दिले. त्यानंतर राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय क्रीडा, कला आणि विज्ञान स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर मोफत गणवेश वाटप करण्यात आले. प्रशालेला आर्थिक मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे शिक्षिका नेहा पाटोळे यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg