loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर आरोग्य विभागाची दमदार कामगिरी, जखमींवर घरी जाऊन केले उपचार

वेळणेश्वर (वार्ताहर) : तालुक्यातील मौजे पांगारी तर्फे हवेली येथील घरावर आंब्याचे झाड पडून जखमी झालेल्यांना घरात जाऊन तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी उपचार केले. सध्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात झाडे कोसळून घरांची पडझड होणे नुकसान होणे अशा घटना घडत आहेत. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी होत आहेत. अशा परिस्थितीत गुहागर आरोग्य विभागाची कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर उपचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आपली जय्यत तयारी केली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे पाणीपुरवठा आणि पाणी शुद्धीकरणावर परिणाम होऊ शकतो आणि जलजन्यआणि कीटकजन्य आजारांची साथ पसरू नये आणि आरोग्य सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी तालुका आरोग्य विभाग गुहागर सज्ज झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रत्येक प्रा आ केंद्रात साथरोग नियंत्रणासाठी कक्ष स्थापन करण्यात आले असून संपर्क पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे. जलजन्य आणि कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवला आहे. श्वान विंचू आणि सर्प दंशावरील लसीचा आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याची सूचना देण्यात आल्या आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिका चालू आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करण्याची सूचना संबंधित ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना ग्रहभेटी आणि साथरोग सर्वेक्षण नियमित करण्याची सूचना देण्यात आली आहे. ओ टी टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

संपर्क अधिकारी पर्यवेक्षक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय राजेश जाधव आरोग्य सहाय्यक संपर्क 9421227840 १) प्रा आ केंद्र आबलोली - महेश जांभळे, आरोग्य सहाय्यक संपर्क क्रमांक 9657231926 २) प्रा आ केंद्र चिखली - सागर मोरे, आरोग्य सहाय्यक संपर्क क्रमांक 9405775959 ३) प्रा आ केंद्र हेदवी - दत्तात्रय मुद्दमवार, आरोग्य सहाय्यक संपर्क क्रमांक 9421137046 ४) प्रा आ केंद्र कोळवली - नथुराम जानवळकर, आरोग्य सहाय्यक संपर्क क्रमांक 9552734957 ५) प्रा आ केंद्र तळवली - मदन जानवळकर, आरोग्य सहाय्यक संपर्क क्रमांक 9421138364 सर्व नागरिकांनी शिळे अन्न खाणे टाळावे. सर्वांनी पाणी गरम गाळून पिण्यासाठी वापरावे. घरात आणि आजबाजूच्या परिसरात स्वच्छता राखावी. साथीच्या आजाराचे रुग्ण आढळ्यास आपल्या गावातील आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा. रुग्णवाहिकेसाठी 102 आणि 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg