देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या विघ्रवली येथील प्रसिद्ध उद्योजक विजय पालकर आणि पालकर यांनी आपल्या फार्म हाऊसवर या अभियानाचे नियोजन केले होते. यावेळी तालुक्यातील बरीच शेतकरी मंडळी उपस्थित होते. या सेंद्रिय शेती अभियानाबाबत मार्गदर्शन करताना युयुत्सु आर्ते यांनी या अभियानाबाबत तसेच बऱ्याच विषयांबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी खर्च आणि उत्पन्नाची बेरीज करूनच शेती करावी, मग ती सेंद्रिय असो व अन्य कशी, असे आर्ते म्हणाले. कोकणात शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये एवढी उत्सुकता नसल्याने नाराजी व्यक्त केली. बांबूच्या शेतीतून फार मोठे उत्पन्न मिळू शकते, असेही सांगितले. एकदा लागवड केली की पुन्हा त्याच्यावर खर्च करायची गरज लागत नाही. बांबू तोडणी ही बांबू खरेदी करतो तोच करतो. पन्नास रुपयांच्या बांबूमध्ये हस्त कौशल्यातून शंभर दोनशे रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत उत्पन्न मिळू शकते. असेही या वेळीं दाखले दिले. कोकणातील युवक दिवा गाडीने मुंबईत जातो आणि पोटापुरतीच नोकरी करतो. त्यापेक्षा कोकणातील लाल मातीत उत्पन्न घेऊन लाखो रुपये कमवू शकतो, असे आर्ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असून पाच लाखापर्यंतचे अनुदानित उद्योग असूनही कोकणातील शेतकरी अशा योजनांकडे फिरकतही नाही आणि माहिती ही घेत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली.
पूर्वी शाळेतील मुलांना शेतीसाठी सहा दिवसाची सुट्टी असायची परंतु आत्ता ती सुट्टी बंद झाली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला शेती विषयाबाबत काहीच कळत नाही तसेच मुलांचा चिखल मातीशी काहीही संबंध येत नाही किती विषयाकडे तरुणांच दुर्लक्ष होत असल्याची खंत आर्ते यांनी व्यक्त केली. आनंद बोंद्रे यांनी सेंद्रिय शेतीबाबत उत्कृष्ट माहिती दिली. आपण करत असलेली शेती ही फायदेशीर नसून त्याला नियोजन पद्धतीने शेती केल्यास उत्पन्न वाढ होऊ शकते व शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो याचीही उदाहरणे दिली. शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध खते देऊन वेळेवर चार्ट प्रमाणे फवारणी केल्यास चांगले उत्पन्न मिळेल असे बोंद्रे म्हणाले. यावेळी मंडळ अधिकारी पाटक यांनी शासनाच्या अनेक योजनांबाबत माहिती दिली तसेच सेंद्रिय शेती आणि ग्रुप शेती याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी एकट्याने शेती करण्यापेक्षा ग्रुप शेती केल्यास अधिक उत्पादन निघू शकते त्याचे अनेक दाखले दिले. गटविकास अधिकारी लोकरे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच कृषी विभागाच्या यादव यांनीही शासनाच्या अनेक योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असेही सांगितले.
या कार्यक्रमाच्यावेळी पालकर यांनी आपल्या मुंबई ते देवरुख विघ्रवली पर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली. पालकर फार्ममध्ये सीनियर सिटीजनची स्थापना का केली याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती का करावी याबाबतही माहिती दिली. पालकर फार्मचे सर्वेसर्वा विजयराव पालकर यांनीही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन केले. पालकर फार्म येथे कॉफीची ही लागवड करण्यात आल्याचे सांगितले . जि .प.सदस्य प्रमोद अडटराव यांनीही आपले विचार मांडले. रानभाज्या बाबत पी.एच.डी. करणारे आतिश माईनके यानी रानभाज्यांच्या 80 प्रकाराबाबत माहिती देऊन अनेक वेगवेगळ्या भाज्यांचे बियाणे व रोपे यांचे आपण संवर्धन करत असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कृष्णा पालेकर यांनी केले होते त्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.