वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' वैभववाडी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळ्यात कृषी दिनाचे औचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार मंत्री भरतशेठ गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सहसचिव परिमल सिंह तसेच कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश संसारे व त्यांच्या पत्नी सुवर्णा संसारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्काराबद्दल वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महेश संसारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मांगवली गावचे सुपुत्र असलेले महेश संसारे हे जिल्ह्यात प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि शेतीपूरक व्यवसायाची यशस्वी उभारणी करून त्यांनी कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी कृषी विषयातील पदवी संपादन केली असून पंचगव्य थेरपीमधील मास्टर डिप्लोमा पूर्ण केला आहे. भारतीय देशी गायीचे दूध, मूत्र, शेण, तूप व दही या पंचगव्य घटकांपासून आयुर्वेदिक तेल व विविध औषधांची निर्मिती करून त्यांनी पंचगव्य थेरपीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. महेश संसारे हे विविध सामाजिक, कृषी व सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. ते गव्यसिद्ध एम.डी. इन पंचगव्य थेरपी (AM) असून प्रवण फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वैभववाडीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी तालुका खरेदी-विक्री सहकारी संघ, वैभववाडीचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्यचे जिल्हाध्यक्ष तसेच सिंधुदुर्ग जिल्हा देशी गोपालक/गोरक्षक संघाचे अध्यक्ष आहेत.
याशिवाय सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चा सचिव, कोकण विद्या प्रसारक मंडळ उपाध्यक्ष, आत्मा शेतकरी सल्ला समितीचे तालुका व जिल्हास्तरीय सदस्य, रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे सदस्य, ग्रामपंचायत मांगवलीचे माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, सिंधुदुर्गचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. या पूर्वीही महेश संसारे यांनी राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला असून राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला आहे. तसेच कृषीथॉन, नाशिकचा आदर्श दुग्ध उत्पादक पुरस्कार तसेच रोटरी क्लब, खरेदी-विक्री संघ, कोकण व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर आणि वैश्य समाज यांच्यासह विविध संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. कृषी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व पंचगव्य संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची ही राज्य शासनाने घेतलेली दखल असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.