loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळेतील अनिकेत काळोखे याला 64 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार पुरस्कार

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील अनिकेत नरेश काळोखे याला 64 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. अनिकेत काळोखे हा मूळचा देवळे गावचा तो सध्या मुंबई येथे नाटक, टीव्ही सिरीयल, सिनेमा, शॉर्ट फिल्म यासारख्या कलाकारांचा मेकअपमन म्हणून काम करतो. त्याला रंगभूषेतीलअनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2008 सालापासून रंगभूषाकार म्हणून शिकायला सुरुवात केली. किशोर पिंगळे, मनोज शेटे यांच्याकडून रंगभूषा करण्याची व रंगांची ओळख झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यांच्याबरोबरच मराठी नाटक, गुजराती सिरीयल केल्या. राजेश परब यांच्याबरोबर व्यावसायिक मराठी नाटक केली. जिम पोरी जिम, लग्न बंबाळ, इच्छा माझी पुरी करा, अशी बरीच नाटक अनिकेत यांनी केली. दत्ता भाटकर यांच्यामुळे ऐतिहासिक मेकअपचा हात बनला शंभुराजे सारखे नाटक शिवपुत्र शंभूराजे महानाट्य करण्यास संधी मिळाली. नंतर अजंठा मराठी पिक्चर, हिंदी इन्कार मूवी, कट्टी बट्टी सिरीयल, अनेक शॉर्ट फिल्म, एकांकिका केल्या. पाऊले चालती पंढरीची वाट हे पहिलं नाटक अनिकेत याने स्वतंत्र मेकअप म्हणून केलं. हे करत असताना बालनाट्य राज्य नाट्य स्पर्धा करण्याची संधी त्याला मिळाली. महाराष्ट्र राज्य नाट्य मध्ये 2013 / 14 शोध बाई शोध नाटकाला उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून अवॉर्ड मिळालं.

टाईम्स स्पेशल

2015 ला हनुमान बालनाट्यला पुरस्कार मिळाला. व्यावसायिक नाटकाला 2017 ला घोळात घोळ या नाटकाला गंधार पुरस्कार मिळाला. 2019 नवा सूर्य नाटक तर 2026 ला अडलंय काय, या बालनाट्याला उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पुरस्कार मिळाला. या कलेमुळे वेळेची शिस्त आणि खूप काही आपल्याला शिकता आल्याचे अनिकेत याने म्हटले. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg