loader
Breaking News
Breaking News
Foto

सोलापूरच्या अवघ्या १२ वर्षीय अब्दुल्लाह इमरान या विद्यार्थ्याने सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल रस्त्यावर चालून दाखविली

रत्नागिरी ( रत्नागिरी टाइम्स डेस्क ) : महाराष्ट्रातील सोलापूरच्या अवघ्या १२ वर्षीय अब्दुल्लाह इमरान या विद्यार्थ्याने आपल्या बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या जोरावर एक अप्रतिम वैज्ञानिक चमत्कार करून दाखवला आहे. ​ज्या वयात मुले मोबाईल गेम्समध्ये व्यस्त असतात, त्या वयात अब्दुल्लाहने केवळ ₹९,००० खर्चात कबाडातील (स्क्रॅप) साहित्य वापरून सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल तयार केली आहे.! ही सायकल थेट सूर्यप्रकाशाने चार्ज होते. यात GPS ट्रॅकिंग, डिजिटल स्पीडोमीटर आणि व्हॉइस कंट्रोलची सुविधा आहे. बॅटरी संपल्यास ही सायकल सामान्य सायकलसारखी पॅडल मारूनही चालवता येते ​तब्बल ६ महिन्यांच्या कष्टांनंतर अब्दुल्लाहने हा प्रकल्प पूर्ण केला. मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वयाची किंवा महागड्या शिक्षणाची नाही, तर जिद्द आणि कल्पकतेची गरज असते हेच त्याने सिद्ध केलेले आहे.!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण महाराष्ट्रातील एक मुलगा आपल्या आईवडिलांचं नाव उज्वल करतो. सोलापूरसारख्या भागातला मुलगा जेव्हा विज्ञानप्रेम बाळगतो, तेव्हा आपोआपच त्या भागातील व उर्वरित निमशहरी महाराष्ट्रात राहणाऱ्या लहानग्यांना विज्ञानाची आवड निर्माण होऊ शकते. आपण अश्या मुलांना, त्यातही ग्रामीण, त्यातही गरिबीत शिक्षण घेणाऱ्या मेहनती मुलांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांची स्टोरी सगळीकडे पोचवली पाहिजे. जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल. अब्दुल्लाह, छोट्या मित्रा तुझ्या या नाविन्यपूर्ण संशोधनाला मनःपूर्वक सलाम. उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद दिले जात आहेत .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg