वणोशी तर्फे पांचनदी: (सागर गोवळे) - ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, ’कृषी सखी’ गटाच्या वतीने धांतोंडी वाडी, वणोशी तर्फे पांचनदी येथे शेतकर्यांसाठी ’कीटकनाशके व बुरशीनाशकांची सुरक्षित हाताळणी आणि फवारणी उपकरणांची देखभाल’ या विषयावर विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमात शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम. आणि मुस्कान कसोटीया, नित्या राज या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रसायनांच्या चुकीच्या वापरामुळे होणारे आरोग्यविषयक धोके टाळणे हा होता. फवारणी करताना वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर जसे की, हातमोजे, फेस मास्क, हेअर कॅप आणि संरक्षक कपडे यांचा वापर का आवश्यक आहे, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींनी करून दाखविले. शेतकर्यांनी औषधांच्या लेबलवरील सूचना वाचून शिफारस केलेल्या प्रमाणातच औषध वापरावे, तसेच कडक ऊन किंवा जोरदार वार्यात फवारणी टाळावी, असा सल्ला देण्यात आला. तसेच, फवारणी यंत्राची कार्यक्षमता टिकवण्यासाठी वापरानंतर ते स्वच्छ धुणे आणि त्यांची योग्य देखभाल कशी करावी, याचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्यांनी या प्रात्यक्षिकात उत्साहाने सहभाग घेत रसायनांची साठवणूक आणि उपकरणांच्या देखभालीबाबत अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे शेतकर्यांमध्ये पीक संरक्षण रसायनांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.