loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का ,६ खासदारांच्या विलीनिकारानास मंजुरी

मुंबई : मराठी जनतेसाठी मोठी बातमी आहे , ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे भवितव्य काय असेल, असे विचारले जात होते. खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरे यांच्या पक्षाने कायदेशीर पावलं टाकायला सुरुवात केली होती. काहीही झालं तरी बंडखोरी केलेल्या बंडखोरांची खासदारकी जाणारच, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात होता. परंतु आता ठाकरे गटाला जबर धक्का देणारी माहिती समोर येत आहे. बंडखोर खासदारांच्या गटाचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील विलिनीकरणास मंजुरी देण्यात आलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार लोकसभा सचिवालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या सहा बंडखोर खासदारांनी ठाकरे गटापासून फारकत घेत वेगळा गट स्थापन केला होता. तसे पत्रही या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिले होते. दुसरीकडे ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन आमच्या पक्षाने कोणामध्येही विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, अशा आशयाचे पत्र दिले होते. तसेच कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू जाणून घ्यावी, अशी विनंतही ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. परंतु आता ठाकरे गटाला जबर धक्का देणारी ही माहिती समोर आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg