loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे एमआयडीसी कंपनीतील विषारी राख ओपन प्लॉट मध्ये टाकल्याने गायी गुरे मोकाट प्राण्यांच्या जीविताला धोका

खेड (दिलीप देवळेकर)- लोटे एमआयडीसीतील एका कंपनीतून ओपन प्लॉट मध्ये विषारी केमिकल युक्त राख टाकल्याने सदर विषारी राख त्यामुळे गायी गुरांना जीवितास कारणीभूत करणार आहे. कारण आता पाऊस पडू लागल्याने ही राख पाण्यासोबत मिसळली जात आहे. याबाबत खेड तालुक्यातील भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे आक्रमक झाले आहेत. खेड तालुक्यातील लोटे एम.आय.डी.सी मधील एका कंपनीमधील विषारी रासायनिक राख कंपनीच्या बाजूच्या मोकळ्या आवारात उघड्यावर टाकण्यात आली. पावसाळा चालू असल्याने ती विषारी राख पाण्यामध्ये मिसळते, त्यामुळे मोकाट फिरणारे गुरांना सदर विषारी पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच विभागात जलजीवन मिशनचे पिण्याच्या पाण्याचे काम सुद्धा चालू आहे. हे विषारी पाणी पावसाच्या पाण्यासोबत वाहून पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळल्यास स्थानिक नागरिकांना सुद्धा जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो. यावर भाजप उत्तर जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय आखाडे म्हणाले की प्रशासनासोबत या कंपनीचे काही साटेलोटे आहे का. कारण अशा प्रकारची विषारी राख ओपन प्लॉट मध्ये टाकण्याची या कंपनीला रीतसर परवानगी आहे का. आणि त्यामुळे गायी गुरे, माणसे दगावली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg