दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी दोडामार्ग तहसील कार्यालयात वीज ग्राहकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या बैठकीत वीज ग्राहकांनी वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाबाचा पुरवठा, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी, दुरुस्तीतील विलंब तसेच महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत विविध तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या समस्या संयमाने ऐकून घेत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी संबंधित वीज महावितरण अधिकारी योग्य उत्तर देऊ शकले नाही.
दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे जिल्हाधिकारी तुप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत उपविभाग अधिकारी, तहसीलदार राहुल गुरव, तसेच सभापती पार्वती गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, सुभाष गवस, प्रविण गवस, प्रकाश गवस, संदीप गवस, रविकिरण गवस, संजय देसाई, संतोष शेटये, अनिल शेटकर, संजय गवस, संतोष मोरये, संदेश वरक, तसेच अनेक गावातील सरपंच सामाजिक कार्यकर्ते वीज ग्राहक दोडामार्ग व्यापारी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहक सामाजिक कार्यकर्ते गणेशमूर्तीकार यांनी वीज महावितरणमुळे किती नुकसान सहन करावे लागते याचा पाढाच जिल्हाधिकारी समोर वाचला. आम्हाला अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले. बैठकीदरम्यान ग्राहकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली असून, भविष्यात अशा तक्रारी कमी करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध कामकाज करावे, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.