मालवण (प्रतिनिधी) - मालवण पंचायत समितीच्या सभेत स्मार्ट वीज मीटर वरून जोरदार खडाजंगी होऊन सदस्यांनी वीज अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. मालवण तालुक्यात ठिकठिकाणी वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची परवानगी न घेता त्यांचे जुने वीज मीटर बदलून नवे स्मार्ट वीज मीटर लावले जात आहेत, या स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीज बिले येत असून वीज ग्राहक त्रस्त बनले आहेत. वीज अधिकाऱ्यांनी विनापरवानगी स्मार्ट मीटर लावू नयेत अन्यथा लावलेले स्मार्ट मीटर आम्ही लोकप्रतिनिधी काढून फेकून देऊ, असा आक्रमक इशारा पं. स. सदस्य बंडू चव्हाण यांनी सभेत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच ग्राहकांच्या परवानगी शिवाय वीज कंपनीने स्मार्ट मीटर लावू नयेत, असा ठराव या सभेत बंडू चव्हाण यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी राजे सभागृहात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. या सभेला उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, तसेच पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, रिया बावकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, मानसी भोगावकर, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण आणि विविध शासकीय खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दशावतार कलेसाठी शासनाने दुप्पट केलेले अनुदान तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त झाल्याबाबत यासाठी प्रयत्न करणारे आम. निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत घेण्यात आला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.