loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील बँक खात्यांचा वापर करून देशभरात सायबर फसवणूक; मंडणगड पोलिसांत गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड येथे सायबर फसवणुकीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात आरोपींनी बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट खात्यांचा वापर करून ऑनलाईन सायबर फसवणूक केली. सदर बँक खात्यांवर देशभरातील सायबर फसवणुकीच्या वेगवेगळ्या ३ प्रकरणांमधील पैसे स्वीकारण्यात आले. यानंतर ही रक्कम पुढील खात्यांमध्ये वर्ग करण्यासाठी आरोपींनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रकरणी १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) सह भा.द.वि. कलम ४२०, ४१९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg