loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत टीजेएसबी सहकारी बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

दापोली, (चंद्रशेखर जोशी) : देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्यीय नागरी सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने कोकणातील विस्ताराला आणखी गती देत दापोली येथे नवीन शाखा सुरू केली आहे. या शाखेचे उद्घाटन पद्मश्री भीकूजी (दादा) रामजी इदाते यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास डॉ. संजय भावे (कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्घाटनप्रसंगी बोलताना पद्मश्री इदाते यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत टीजेएसबी बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन करून आधुनिक बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्याचे सांगितले. दापोली शाखेमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि युवा उद्योजकांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. संजय भावे यांनीही कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व विश्वासार्ह बँकिंग व्यवस्था आवश्यक असल्याचे नमूद केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमात टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी रत्नागिरी व अलिबागनंतर दापोलीतही शाखा सुरू करून कोकणातील सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला. तर व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांनी दापोली शाखेत बचत व चालू खाती, मुदत ठेवी, गृह, वाहन व व्यवसाय कर्ज, तसेच इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि इतर डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. सन १९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक सध्या सात राज्यांमध्ये १७० हून अधिक शाखांद्वारे सेवा देत असून ₹२५,००० कोटींपेक्षा अधिक व्यवसायाचा टप्पा गाठत सहकार क्षेत्रात स्वतंत्र आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg