loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबखोल तांबडवाडी शाळेची मुले प्रज्ञाशोध परीक्षेत चमकली

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - अक्षर भारती प्रतिष्ठान संचलीत अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी २०२६ मध्ये केंद्रवार करण्यात आले होते. अशा स्पर्धा परीक्षेचा हेतू खरा असतो की, लहानपणापासूनच अशा मुलांना सामान्य ज्ञान, तर्कज्ञान, निर्णयक्षमता, अचुकता, फरक, टप्प्यांचे संख्या ज्ञान, तात्काळ उत्तर लिहिण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी अंगीकृत करण्याची सवय सातत्याने लागली पाहिजे. म्हणूनच ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळावी व बुद्धीला चालना मिळावी अशा उद्देशाने सांगलीतील अक्षरभारती प्रतिष्ठान प्रज्ञावंत मुलांचा शोध घेण्यासाठी अशा परीक्षांचे आयोजन करत असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या परीक्षेसाठी चिपळूण तालुक्यातील आंबतखोल तांबडवाडी शाळेतील मुले प्रविष्ट झाली होती. त्यापैकी हर्ष तुषार फुटक हा राज्यात तिसरा, अनुजा अनिल खापरे ही राज्यात चौथी तर गौतमी गणेश पवार ही केंद्रात चौथी उत्तीर्णाने उज्वल यश संपादन केले आहे. यासठी मुख्याध्यापक चंद्रशेखर राऊत, सहशिक्षक दशरथ निमुणकर, यांनी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी अथक परिश्रम घेतले. या उत्तुंग यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा विकास कमिटी व सर्व सदस्य, माता पालक संघ सर्व सदस्य, पालक शिक्षक संघ सर्व सदस्य, विकास कमिटी सर्व सदस्य, व गावातील तमाम ग्रामस्थांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg