चिरणी (सुरेश देवरुखकर) - खेड तालुक्यातील चिरणी येथे परशुराम हॉस्पिटल लोटे व ग्रामपंचायत चिरणी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. हे आरोग्य तपासणी शिबिर चिरणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यवान आंब्रे व माजी ग्रामपंचायत उपसरपंच सुवर्णा आंब्रे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला आहे. दरम्यान या शिबिरामध्ये विविध प्रकारचे आजार, महिलांचे आजार तसेच शुगर व ब्लड प्रेशर, नेत्र रुग्ण तपासणी व विविध आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली आहे. या निमित्ताने डॉक्टर नयनेश कांबळे मेडिकल काय चिकित्सक, डॉक्टर नेहा मयेकर सर्जिकल शल्य, डॉक्टर निखिल माळी नेत्र तपासक, डॉक्टर अंकिता पावले पंचकर्म, डॉक्टर अंजली डाके बालरोग तज्ञ व स्त्री रोग तज्ञ, आदी नामवंत डॉक्टरांनी तपासणी केली. गावातील विविध रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराला चिरणी सरपंच सलोनी देवरुखकर, उपसरपंच योगेश आंब्रे, चिरणी पोलीस पाटील रिया जाधव, माजी सरपंच अविनाश आंब्रे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यवान आंब्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक आंब्रे, भाजपाचे जगदीश आंब्रे, किशोर आंब्रे, संजय आंब्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिरणी शाखाप्रमुख राकेश जाधव, मुंबई मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव, आशा सेविका राजश्री आंब्रे, अंगणवाडी सेविका श्रद्धा आंब्रे, रेखा पवार, माजी सैनिक कॅप्टन संजय आंब्रे, गंगाधर आंब्रे, भिकाजी आंब्रे, शांताराम आंब्रे, चिरणी महिला ग्राम संघ अध्यक्ष शर्मिला आंब्रे, आरोग्य कर्मचारी प्रवेश आंब्रे आदि उपस्थित होते. दरम्यान पत्रकार सुरेश देवरुखकर यांनी उपस्थित मान्यवर व परशुराम हॉस्पिटलचे डॉक्टर नर्स व कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.