loader
Breaking News
Breaking News
Foto

पेजे महाविद्यालयात लावणी प्रात्यक्षिक उपक्रम यशस्वीरित्या संपन्न

लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नेचर क्लब विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १६ जुलै २०२६ रोजी लावणी प्रात्यक्षिक उपक्रम आयोजित करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनमध्ये शेतीविषयक कामाची गोडी वाढावी, शारीरिकदृष्ट्‌या परिपक्वता वाढावी तसेच प्रत्यक्षदर्शी शेतीलागवड कशी करावी? याबाबत प्रत्यक्ष आकलन/समज व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवार आंबेरे (कातळवाडी) येथील शेती क्षेत्रात लावणी प्रात्यक्षिक करण्यात आले. या उपक्रमासाठी श्रमिक किसान सेवा समिती संचालित रत्नागिरीचे सचिव राजस मोहिते, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ओंकार लिंगायत, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा.अमित पवार, नेचर क्लब विभागप्रमुख प्रा.अर्चना चव्हाण, प्रा.शालिनी चांदले, कला विभागप्रमुख प्रा.कल्पना मेस्त्री, प्रा. सानिका पोतकर, ग्रामस्थ आणि महाविद्यालयातील स्वयंसेवक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून लावणी प्रात्यक्षिक उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg