loader
Breaking News
Breaking News
Foto

झोंबडी गावचे सामाजिक कार्यकर्ते परेश लांजेकर यांच्या वतीने झोंबडी शाळा नं.१ व आदर्श शाळा सुरळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप

वरवेली (गणेश किर्वे ) : गुहागर तालुक्यातील झोंबडी तेलीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते परेश लांजेकर यांच्या वाढदिवसानिमित्त झोंबडी केंदीय शाळा नं.१ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सुरळ या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. झोंबडी शाळा नं.१ मधील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, सामाजिक कार्यकर्ते परेश लांजेकर, पत्रकार गणेश किर्वे, विनोद चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक स्नेहल गायकवाड, रेखा चव्हाण, बालाजी मानसिंगे, सत्यवान सावर्डेकर, विवेक पालशेतकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सामाजिक कार्यकर्ते परेश लांजेकर यांची आरती ओवाळून ओवाळणी केली. उपस्थित सर्वांनी परेश लांजेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सुरळ या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन्नाथ भोसले, शाळेचे मुख्याध्यापक वीरसिंह पावरा, शिक्षिका आदिती सरदेसाई, दिनेश रांगळे, सचिन रावणंग, विनोद चव्हाण उपस्थित होते. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन्नाथ भोसले यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg