loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रुप ग्रामपंचायत कळंबणी बु. च्या वतीने मोफत छत्री वाटप

खेड - ग्रुप ग्रामपंचायत कळंबणी बु. च्या वतीने गावातील शाळा कळंबणी बु. नं. 1, शाळा कळंबणी बु. नं. 2, शाळा वाळंजगाव या तिन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. कळंबणी गावचे सरपंच भगवान साळुंके यांची शिक्षणाविषयी नेहमीच तळमळ दिसून येते. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. काही दिवसापूर्वीच त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शाळांतील सर्व मुलांना उच्च दर्जाचे स्पोर्ट ड्रेस वाटप केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी सरपंच भगवान साळुंके, उपसरपंच मुकेश देवघरकर, पोलिस पाटील नरसिंह सुतार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र आदावडे, हरिश्चंद्र सुतार, ग्राम विकास अधिकारी संदेश पवार तसेच ग्रामस्थ व तिन्ही शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg