loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नांसंबंधात उच्चाधिकार समितीच्या बैठकीला खासदार नारायणराव राणे यांची उपस्थिती

मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संदर्भात मुंबईतील विधानभवनात आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांनी समितीचे सदस्य म्हणून सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैभक विधानभवन येथे पार पडली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नारायणराव राणे यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेली उच्चाधिकार समिती पुनर्गठित केली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या खटल्याला गती देणे, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर चर्चा करणे आणि पुढील कायदेशीर रणनीती ठरवणे, हा या बैठकीचा मुख्य हेतू होता. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. सीमावासीयांच्या हक्कांसाठी आणि सीमाप्रश्नी कायदेशीर लढाई अधिक मजबूत करण्यासाठी या उच्चाधिकार समितीच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांचेसह मंत्री नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg