खेड - पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे “शाश्वत १०१” या उपक्रमांतर्गत देवणा पूल ते खारीफाटा रस्त्याच्या दुतर्फा १०१ झाडे लावण्याचा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला. खेड नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य तथा लायन्स सदस्य लायन राजेश जोयसर, लायन उमेश चव्हाण आणि लायन परेश चिखले यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून जोरदार पाऊस व पूरपरिस्थिती असतानाही लायन्स सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची वेळ सकाळी ८.३० वाजता असली तरी ज्येष्ठ सदस्य लायन पंकज शहा यांनी सकाळी ७.३० वाजताच कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. वन विभागाच्या नियमानुसार आदल्या दिवशीच खड्डे तयार करून घेतल्यामुळे वृक्षारोपण कार्यक्रम नियोजित वेळेत आणि यशस्वीरित्या पूर्ण झाला. उपस्थित प्रत्येक लायन्स सदस्याने प्रत्यक्ष झाडे लावत पर्यावरण संवर्धनाबाबतची आपली सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमासाठी वन विभागाचे अधिकारी उदय भागवत, परमेश्वर डोईफोडे, अशोक ढाकणे, राणबा बंबर्गेकर आणि वैभव काटेखाये हे उपस्थित होते. तसेच खारी गावचे पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक विनोदजी बहुतुले तसेच नांदगाव, खारी व सुसेरी येथील ग्रामस्थांनीही वृक्षलागवडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी डॉ. विक्रांत पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना लायन्स क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच कार्यक्रम प्रमुख लायन राजेश जोयसर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करत लावण्यात आलेल्या वृक्षांची देखभाल व संवर्धनाची जबाबदारी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी स्वीकारणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वन विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, नागरिक, लायन्स सदस्य व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष लायन अविनाश दळवी, सचिव लायन उत्तम कांबळे, खजिनदार लायन संदीप मोरे यांच्यासह लायन पंकज शहा, लायन रोहन विचारे, लायन प्रतीक गिल्डा, लायन सागर करवा, डॉ. विक्रांत पाटील, लायन विवेक कदम तसेच डायमंड सलोनचे कर्मचारी आणि नांदगाव, खारी व सुसेरी परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. “एक झाड आज लावूया, उद्याचा श्वास जपूया” या संदेशासह लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.