श्रीवर्धन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगड विभागासाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तरुण नेतृत्वाला संधी देत फैजल पोपेरे यांची उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे श्रीवर्धन, म्हसळा, तळा या दक्षिण रायगडातील तालुक्यांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मला दिलेल्या संधी व जबाबदारीला परिपूर्ण न्याय देणार असल्याची भावना फैजल पोपेरे यांनी व्यक्त केलीय. मनसेकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार फैजल पोपरे यांच्याकडे दक्षिण रायगड क्षेत्रातील संघटन विस्तार, पक्षाच्या धोरणांचा प्रसार तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून विविध लोकहिताच्या व विधायक समाजाभीमुख उपक्रमांमधून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
फैजल पोपेरे यांनी गेल्या काही वर्षांत युवकांना संघटित करण्याचे काम, सामाजिक उपक्रम, गरजू नागरिकांना मदत, स्थानिक प्रश्नांवर पाठपुरावा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून समाजात आपला ठसा उमटवला आहे. विधानसभा निवडणूक लढवीत त्यांनी पक्षाची ताकत दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे नाते निर्माण झाले असून आता त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नियुक्तीपत्रात पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून संघटनात्मक शिस्त जपण्याचे तसेच समाजाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करताना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन कार्य करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर फैजल पोपरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत दक्षिण रायगडातील जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. "पक्षाने दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, युवकांच्या समस्या आणि विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून मनसेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे," असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दक्षिण रायगडातील अनेक सामाजिक, राजकीय आणि युवा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फैजल पोपेरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्तीमुळे दक्षिण रायगडातील मनसे संघटन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.