संगमेश्वर(प्रतिनिधी)- संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीअंतर्गत कुटगिरी-येडगेवाडी येथील पाच पाणीवंचित कुटुंबांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ३० जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमेश्वर यांना देण्यात आले आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, येडगेवाडीतील १४ कुटुंबांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शासकीय विहिरीवरून विनापरवाना खाजगी नळपाणी योजना सुरू केली होती. ही योजना सुरळीत सुरू असताना उन्हाळ्यात काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक पाईपलाईन तोडल्याने पाच कुटुंबांतील वयोवृद्ध नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडे तीन महिन्यांपूर्वी लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीची विधिवत परवानगी घेऊन शासकीय विहिरीवरून स्वखर्चाने नळपाणी योजना उभारण्याचे काम सुरू केले असता काही व्यक्तींनी बेकायदेशीर हरकत घेत अडथळे निर्माण केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शासकीय विहिरीतील विनापरवाना पंप जप्त करावा, सामायिक जमिनीतून टाकलेली अनधिकृत पाईपलाईन हटवावी, तसेच नव्या नळपाणी योजनेस परवानगी देऊन काम पूर्ण करण्यास मदत करावी किंवा शासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास ३० जुलैपासून पंचायत समिती संगमेश्वर कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी रामचंद्र येडगे, धोंडिबा येडगे, हरिश्चंद्र येडगे, शंकर येडगे, अनंत येडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.