loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णै बायपास समुद्रकिनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळलेल्या डॉल्फिनवर अंत्यविधी

दापोली (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील हर्णे बायपास समुद्रकिनाऱ्यावर एक अटलांटिक स्पॉटेड डॉल्फिन (Atlantic Spotted Dolphin) मृत अवस्थेत किनाऱ्यावर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कांदळवन वनरक्षक प्रभू साबणे, विश्वंभर झाडे, कासवमित्र दुर्गेश जाधव, कांदळवन समितीचे अध्यक्ष फहद जमादार, हर्णे सुरक्षारक्षक नदीम महाडीक, सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील काझी, तसेच ग्रामपंचायत सदस्य व सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सना काझी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉल्फिनच्या विल्हेवाटीसाठी जेसीबी उपलब्ध न झाल्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वतः पुढाकार घेत मोठा खड्डा खोदून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेत डॉल्फिनला सन्मानपूर्वक पुरले. यावेळी उपस्थितांनी सागरी जीवांचे संरक्षण, समुद्री प्रदूषण रोखणे आणि किनारी भागातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना तात्काळ संबंधित विभागाला कळवाव्यात, असे आवाहन केले..

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg