श्रीवर्धन (संदेश घोलप ) : रायगडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येत आहे. दिघी-आगरदांडा खाडीत मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे एक छोटी मच्छीमारी नौका समुद्रात उलटली आहे. या नौकेतील तीन मच्छीमार समुद्रात बुडत होते. मात्र, त्याच वेळी तिथून जाणाऱ्या दिघी-आगरदांडा फेरीबोटीवरील कर्मचाऱ्यांनी देवदूतासारखं धावून येत या तिघांचेही प्राण वाचवले आहेत. निसर्गाचा कोप आणि पोटाची लढाई यातून ही दुर्घटना घडल्याचं समोर येतंय. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा... मुसळधार पाऊस... आणि जीवाच्या आकांताने मदतीसाठी पुकारणारे मच्छीमार! रायगडच्या दिघी परिसरात आज निसर्गाच्या रौद्ररुपाचा थरार पाहायला मिळाला.
शासनाने ३० मे पासून समुद्रात मच्छीमारीवर बंदी घातली आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी काही गरीब कोळी बांधव जीवावर उदार होऊन किनाऱ्यालगत मासेमारी करत असतात. आज अचानक बदललेलं हवामान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक छोटी होडी दिघीजवळ समुद्रात उलटली. बोटीवरील तीनही मच्छीमार समुद्राच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाऊ लागले. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी'... अगदी त्याच वेळी दिघी ते आगरदांडा दरम्यान धावणारी प्रवासी फेरीबोट तिथून जात होती. फेरीबोटीच्या कॅप्टन आणि खलाशांना समुद्रात लोक बुडत असल्याचं दिसलं आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बचावकार्य सुरू केलं. समुद्रात प्रचंड भरती आणि पाऊस असतानाही, कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने फेरीबोट बुडणाऱ्या मच्छीमारांच्या जवळ नेली. दोरखंडच्या साहाय्याने या तिन्ही मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. फेरीबोटीच्या कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे आज तीन संसार उघड्यावर पडण्यापासून वाचले आहेत."









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.