loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्युत पोल झाले आडवे, मंडणगड लोकरवण अंधारात

मंडणगड (प्रतिनिधी) - म्हाप्रल पंचक्रोशीतील लोकरवण हे एक महत्त्वाचे असे गाव आहे. या गावात विदयुत पुरवठा करण्यासाठी असलेल्या एका विद्युत पोलवर एक आंब्याचा झाड कोसळून पडल. त्यामुळे या गावातील विज पुरवठा खंडित झाला आहे. तो दोन दिवस झाले तरी पुर्ववत सुरू करण्यात आलेला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल पंचक्रोशीतील लोकरवण गावात सोमवारी ६ जुलै रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याने एक भले मोठे झाड मधेच मोडून ते लोकरवण गावाला वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबावर पडले. त्यामुळे एका मागून एक असे काही विद्युत पोल जमीनीवर आडवे पडले. त्यातील एक विद्युत पोल लोकरवण येथील रहिवासी असलेल्या श्रीधर रक्ते यांच्या घरावर पडला.

टाईम्स स्पेशल

त्यात घराचे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती विदयुत महावितरणला देण्यात आली आहे. मात्र दोन दिवस झाले तरी खंडीत झालेला येथील विज पुरवठा अद्यापही पुर्ववत सुरू करण्यात आलेला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg