सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी येथील वैश्य समाज आणि हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १९ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी व ज्ञातीबांधवांचा ’गुणगौरव सोहळा-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात सायंकाळी ५ ते ७ वाजता या वेळेत संपन्न होणार आहे.
या सोहळ्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील वैश्यवाणी ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तसेच यावर्षी विविध क्षेत्रांत उज्ज्वल कामगिरी केलेल्या ज्ञातीबांधवांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
हा गुणगौरव व कौतुक सोहळा यशस्वी करण्यासाठी हिंदू वैश्यवाणी युवा संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष अमित गवढंळकर, वैश्य समाज सावंतवाडीचे ज्येष्ठ रमेश भाट आणि वैश्यवाणी महिला संघटना सावंतवाडीच्या अध्यक्षा तनुजा पोकळे व सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील सर्व वैश्यवाणी ज्ञातीबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून या गुणवंत बांधवांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.