loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी पं. स. सभापती ‘सिद्धेश रावराणे’ यांची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सदस्यपदी निवड

वैभववाडी(प्रतिनिधी) - वैभववाडी पंचायत समितीचे सभापती ‘सिद्धेश रावराणे’ यांची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील ही समिती घटित करण्यात आली असून, त्यामध्ये रावराणे यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव डॉक्टर श्रीपाद एच पाटील यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाच्या निर्णयानुसार, समितीचे कामकाज सदस्य म्हणून त्यांचे सहकार्य राहणार आहे. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री नामदार नितेश राणे आहेत. त्यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या आदेशाखाली समितीच्या बैठका होत आहेत. या निवडीमुळे वैभववाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर होणार असून आरोग्यविषयक विविध योजना व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रावराणे यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg