बुरंबी (ता.संगमेश्वर) - क्रमिक अभ्यासक्रम ही आपली बुद्धीमत्तेची पारख आहे. शास्त्र गणित सारख्या विषयाचे अध्ययन सुरु असताना विद्यार्थ्यामध्ये कुतुहलता जागृत हवीच परंतु हे विषय शिकत असताना भाषा विषयावर सुद्धा प्रभुत्व हवे. पालक आपल्या सर्व गरजा पुर्ण करीत असतात. त्यामुळे शिक्षणाचे महत्व कळत नाही. यासाठी किशोरवयातच विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखुन ज्ञान कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वावलंबी बनावे", असे प्रतिपादन फ्रान्स मधील गेस्पार्ड ले बान्जुआ यांनी दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी- शिवने या प्रशालेतील विद्यार्थ्याना संबोधताना केले. फ्रान्समध्ये आंतराष्ट्रीय संबध व परराष्ट्र धोरण तसेच विज्ञान शास्त्र या विषयाचे गेस्पार्ड हे संशोधन उच्च शिक्षित आहेत. त्यांचे पुढील संशोधन सुरु असतानाही त्यानी निःस्वार्थ भावनेने भारतात येऊन दिनांक २८ जून ते १८ जुलै २०२६ या कालावधीत बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलात सरफरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिला.
यावेळी त्यानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग्तील विद्यार्थ्यांना इंग्रजी उच्चार, संभाषणात्मक इंग्रजी, व्याकरण, व्यावहारिक संवादकौशल्ये आणि नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धती यांवर त्यांनी प्रभावी व उत्स्फूर्त मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मविश्वासाने वापर करण्याची क्षमता विकसित झाली. तसेच, जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी आणि आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात इंग्रजी भाषेचे महत्त्व याबाबत आपण केलेल्यामार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला तयार करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमात संस्था सरचिटणीस शरद गोविंद बाईत यांनी त्यांस कृतज्ञापुर्वक शुभेच्छा देताना "आपला उत्साह, आपुलकी, नम्रता आणि शिक्षणाप्रती असलेली उत्कटता यामुळे आमचे शिक्षकवृंदही प्रेरित झाले. आपल्या आधुनिक अध्यापन पद्धतीचे आणि आपले ज्ञान व अनुभव मुक्तपणे विद्यार्थ्यांसोबत तसेच शिक्षकांसोबत सामायिक करण्याच्या आपल्या वृत्तीचे मी तुमचे मनापासून कौतुक करतो आहे" असे सांगितले.
संस्थेच्या वतीने गेस्पार्ड यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय स्वेच्छासेवेबद्दल आणि दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्वक शाल श्रीफळ व मानपत्र देवून शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेचे शिक्षक सुहास तानाजी गेल्ये यांचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन महामंडळातर्फे राज्यस्तर संसाधन मार्गदर्शक म्हणुन निवड झाल्याबद्दल तसेच त्यांनी राज्यस्तर, जिल्हास्तर वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांसह सहभाग घेवुन विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल तसेच शिक्षक सुहास पाब्ये हे राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व त्यांच्या शालेय क्रिडा स्पर्धातील योगदानाबद्दल अनुक्रमे संस्था उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई, सरचिटणीस शरद गोविंद बाईत यांच्या शुभहस्ते या सभेत गौरवपुर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्राचार्य श्री प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे व शालेय कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्राध्यापक सुरज जाधव व सहाय्यक शिक्षिका स्मिता हर्डीकर यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.