loader
Breaking News
Breaking News
Foto

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे संगमेश्वरात भाजपाकडून जंगी स्वागत; छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला दिली भेट

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान संगमेश्वर येथील कसबा परिसरात प्रस्तावित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्थळाला भेट दिली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे उत्साहपूर्ण व जंगी स्वागत करण्यात आले. भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी मंत्री आशिष शेलार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मंत्री शेलार यांच्या स्वागतासाठी भाजपाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यांच्या आगमनानंतर कसबा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला आणि जल्लोषाच्या वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर मंत्री शेलार यांनी प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची पाहणी केली. स्मारकाच्या आराखड्याबाबत आणि पुढील प्रक्रियेबाबत त्यांनी संबंधितांकडून माहिती घेतली. संगमेश्वर हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित पवित्र स्थळ असल्याने येथे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या स्मारकासाठी भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू असून, तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनीही या विषयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राज्य शासनाकडून आवश्यक निधी, प्रशासकीय मंजुरी आणि इतर सहकार्य मिळावे, यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टाईम्स स्पेशल

मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीमुळे स्मारकाच्या उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती जपणारे आणि भावी पिढीला इतिहासाची प्रेरणा देणारे भव्य स्मारक संगमेश्वरात उभे राहावे, हीच सर्वांची भावना असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. यावेळी भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच स्मारक उभारणीसाठी प्रयत्नशील असलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री शेलार यांच्या या दौऱ्यामुळे संगमेश्वरातील प्रस्तावित स्मारकाच्या उभारणीबाबत नव्याने आशावाद निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg