loader
Breaking News
Breaking News
Foto

आक्षेपार्ह कमेंट्स रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा - ना. योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) - सोशल मीडियाचा वापर सध्याच्या काळात झपाट्याने वाढत असून, त्यावर कोणत्याही बंधनाविना व्यक्त होण्याच्या प्रवृत्तीवर राज्य सरकार आता गंभीर झाले आहे. सोशल मीडियाला सध्या कोणताही फिल्टर राहिलेला नाही. त्यामुळे यापुढील काळात सोशल मीडियावरील बेजबाबदार आणि आक्षेपार्ह कमेंट्स रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा आणण्यात येईल, असा स्पष्ट इशारा योगेश कदम यांनी दिला आहे. अलीकडच्या काळात विविध समाजमाध्यमांवरून कोणत्याही पोस्टवर किंवा एखाद्या व्यक्तीवर काहीही कमेंट्स करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर भाष्य करताना योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, सध्या सोशल मीडियाला कसलाही फिल्टर राहिलेला नाही, त्यामुळे कुणीही उठतो आणि काहीही कमेंट करून मोकळा होतो. मात्र, आता हे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारच्या बेजबाबदार कमेंट्सबाबत शासन लवकरच एक कडक कायदा अस्तित्वात आणणार आहे. या नव्या कायद्यामुळे इंटरनेटवर बेताल वक्तव्ये करणाऱ्यांवर आणि गैरवापर करून बदनामी करणाऱ्यांवर मोठा वचक बसेल. शासनाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावरील वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg