रत्नागिरी जिल्ह्यातील साखरतर गावात गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी खरवते महावितरण विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देत, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली.
यावेळी खरवते विभागाचे विभागीय अधिकारी श्री. पवार यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच त्यांनी या विभागाचा कार्यभार स्वीकारला असून, साखरतर गावातील वीज समस्येची गांभीर्याने दखल घेत एका आठवड्याच्या आत समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मोर्च्यानंतर श्री. पवार स्वतः ग्रामस्थांसमवेत साखरतर गावात आले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. महावितरणच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.