loader
Breaking News
Breaking News
Foto

खास. नारायण राणे यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी)- आपल्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी खा. नारायण राणे यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या भेटीमागील कारण जरी वाढदिवस असले तरी याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे हे कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी होते. यावेळी यावेळी निलमताई राणे, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिवाकर मुरकर, अवधुत मालणकर आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर संदेश पारकर सर्वच राजकीय पक्षांच्या संपर्कात आहेत. यापूर्वी संदेश पारकर यांनी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम केले होते. मात्र त्यानंतर संदेश पारकर हे ग्रामीण पासून दूर गेले होते.कणकवलीत नगरपंचायत निवडणूकीत आ. निलेश राणे यांनी संदेश पारकर यांच्या विजयात शहरविकास आघाडीच्या माध्यमातून सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर संदेश पारकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा गेल्या महिन्यांपासून सुरु आहेत. परंतु, काही दिवसापासून संदेश पारकर कुठल्या पक्षात प्रवेश करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष असतानाच थेट खा. नारायण राणे यांच्या निवासस्थानी जात संदेश पारकर यांनी भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी खा. नारायण राणे व नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यामध्ये विविध विकासात्मक मुद्दांवर चर्चा झाली. खा. नारायण राणे यांनी संदेश पारकर यांना कणकवली शहरात चांगला विकास करा, अशा सुचना दिल्या. घरात संदेश पारकर यांचे आगमन होताच.खा. राणे यांनी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने या भावी खासदार असे बोलत संदेश पारकर यांचे स्वागत केले. जिल्ह्यात संदेश पारकर यांचे भावी खासदार, भावी आमदार या आशयाखाली लागलेल्या बॅनरच्या पार्श्वभूमीवर खा. नारायण राणे यांनी पारकर यांना गोड शुभेच्छा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg