मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल च्या श्रीमती सुलोचनाताई पाटील हॉल मध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत करिअर मार्गदर्शक व विश्लेषक नेहा करंदीकर- हुनारी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मधील दहावीवी चे विद्यार्थी - विद्यार्थिनी, त्यांचे पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका तेजल वेंगुर्लेकर, उपमुख्याध्यापक निशाकांत पराडकर, दहावीचे वर्गशिक्षक पंकज राणे, शिक्षिका हर्षा सावंत आणि बॅ. नाथ पै सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापिका सौ. तेजल वेंगुर्लेकर आणि निशाकांत पराडकर यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाची रूपरेषा पंकज राणे सर यांनी सांगितली. निशाकांत पराडकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. बॅ. नाथ पै सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी सेवांगण आयोजित विविध उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेमध्ये नेहा करंदीकर - हुनारी यांनी दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या वाटांबद्दल माहिती दिली. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स यासारख्या शाखांमध्ये उपलब्ध असलेले अनेक पर्याय तसेच डिप्लोमा कोर्सेस, सर्टिफिकेशन कोर्सेस तसेच दहावीनंतर करिअर निवडताना कुठले निकष वापरायचे, योग्य निर्णय कसा घ्यायचा, मुलांचे व्यक्तिमत्व घडण्यासाठी कोणती कौशल्ये गरजेची आहेत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. आभार निशाकांत पराडकर यांनी मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.