केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या व्यापक वृक्षारोपण अभियानांतर्गत मंगळवारी लांजा एसटी डेपो व बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करून त्याच्या नियमित संगोपनाची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर लांजा एसटी डेपो व बसस्थानक येथे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी काजू, जांभूळ, कोकम, बेहडा, वड, बहावा, आपटा, फणस आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली.
वनविभागाकडून रोपे उपलब्ध करून देण्यात आली. तर गवाणे सामाजिक वनीकरण विभागाकडून २०० व श्रीकृष्ण हेगिष्टे यांच्या प्रयत्नातून भांबेड वनीकरण विभागाकडून १०० रोपे उपलब्ध झाली. दरम्यान, या कार्यक्रमाला लांजा पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर, वनपाल धुळू कोळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, शिवसेना विभागप्रमुख दिनेश पवार, पंचायत समिती सदस्य दिपाली साळवी, वृषाली चव्हाण, रसिका मेस्त्री, शैलेश खामकर, दिपक कदम, प्रवासी संघटनेचे सचिव रविंद्र राणे, सदस्य जितेंद्र चव्हाण, विभागीय भांडार अधिकारी भक्ती वेल्हाळ-फुटाणे, आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर, स.वा.नि. राजू पाटोळे, प्रभारक कार्यशाळा प्रकाश झोरे, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, अमित लांजेकर यांच्यासह लांजा आगाराचे कर्मचारी व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.