दापोली, (चंद्रशेखर जोशी) : ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवून दापोली तालुक्यातील आसूद मोहल्ला येथील एका २२ वर्षीय तरुणीची १० लाख ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८, ३१८ (४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुन ते १२ जुलै २०२६ दरम्यान फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणार्याने ऑनलाईन नोकरीची ऑफर देत व्हॉट्सअॅप व ई-मेलद्वारे संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर विविध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकांचा वापर करून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.
संशयितांनी नोकरीच्या प्रक्रियेच्या नावाखाली फिर्यादींकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण १० लाख ३०० रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करून घेतले. पैसे भरल्यानंतर कोणतीही नोकरी न देता तसेच रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि बँक खात्यांच्या आधारे तपास सुरू केला असून, सायबर माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.