loader
Breaking News
Breaking News
Foto

असुर्डे येथे विनापरवाना खैर लाकूड जप्त, वन विभागाची कारवाई

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - चिपळूण तालुक्यातील असुर्डे महामार्गावर विनापास खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या लाकूडचोरांवर वन विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात खैर लाकूड जप्त केले. ही कारवाई वनपाल अधिकारी रेशमा कावळे आणि जाधव यांच्या पथकाने आज सकाळी सुमारे ९.३० वाजता केली.पथकाने झेनॉन गाडीतून संशयास्पदरीत्या होत असलेली खैर लाकूड वाहतूक थांबवून गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर ही गाडी असुर्डे येथील पटेल मिल येथे जमा करण्यात आली. गाडीची चावीही वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तन्मय मंगेश सुर्वे (साखरपा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८० मण खैर लाकूड विनापरवाना दहीवली येथील कात-भट्टीकडे नेले जात होते. लाकूड काढण्याचा व वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वन विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध लाकूड वाहतूक रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg