रत्नागिरी: नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे रविवारी, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी शहरात शक्ती प्रदर्शनपर 'रूट मार्च' आयोजित करण्यात आला. निवडणुकीच्या काळात शांतता व सुरक्षितता राखण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. यासोबतच, शहरात विशेष वाहन तपासणी मोहीम राबवून कर्कश आवाज करणाऱ्या 'मॉडिफाइड' सायलेन्सर विरोधात कडक कारवाई करत एका वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. राज नगर मरकज, पैजाने अत्तार मदरसा, श्रीराम चौक, कदमवाडी, कीर्ती नगर, जामा मशीद, अलिशान कॉर्नर, क्रांतीनगर आणि पुन्हा राज नगर मरकस मैदान अशा प्रमुख मार्गांवरून पोलीस दलाचे जवान संचलन करत होते. या रूट मार्चमध्ये ०५ पोलीस अधिकारी, १० पोलीस अंमलदार, ०१ एस.आर.पी.एफ (राज्य राखीव पोलीस दल) पथक, ७० पोलीस जवान आणि ६६ होमगार्ड्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस दलाच्या या मोठ्या सहभागामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होण्यास मदत मिळाली.
रूट मार्चसोबतच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्याच दिवशी वाहन तपासणी मोहीमही राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच कर्णकर्कश ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तपासणीत एका दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्या वाहनाचे ‘मॉडिफाइड’ केलेले आणि कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले. वाहन चालकाने वाहनाचे सायलेन्सर बदलल्याचे आढळल्याने त्याच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या मोहिमेतून देण्यात आला आहे.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.