loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा श्री बांदेश्वर मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी देवदीपावली च्या दिवशी हा कार्यक्रम केला जातो. सायंकाळी माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, सरपंच प्रियांका नाईक, तसेच देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने श्री बांदेश्वर भूमिका मंदिर परिसरात दिप प्रज्वलीत केले. श्री बांदेश्वर भक्त महिला सेवेकरी मंडळींनी दिवे भरुन देण्याचे काम केले तसेच मंदिरासमोर सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. श्री बांदेश्वर भुमिका मंदिराचा परिसर दिव्यांच्या तेजाने उजळून गेला होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg