वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायतीमध्ये निवडणुकीचे वारे आता जोरदार होऊ लागले आहेत. त्यातच वार्ड क्रमांक दोन मध्ये माजी सरपंच सतीश शेटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवत असताना त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसादही मिळत आहे. वार्ड क्रमांक दोन मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून सतीश शेटे हे निवडणूक लढवत आहेत. २०११ मध्ये गुहागर ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेले सतीश शेटे हे नगरपंचायतच्या नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गुहागर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली त्या पहिल्या पाच वर्षात गुहागर शहरासह संपूर्ण प्रभागात तात्कालीन नगराध्यक्षांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून गुहागर शहराचा विकास केला. मात्र दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजे गुहागर शहर विकास आघाडीची ज्यावेळी नगरपंचायतीवर सत्ता होती. त्यावेळेला कोणतीही विकास कामे केलेली नाहीत असा आरोप करत त्यांनी विकास कामे करण्यासाठीच मी या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलो असल्याचे सांगितले.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले सतीश शेटे हे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नरेश शेटे यांचे बंधू हे असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सरपंच कालावधीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वतीने त्यांचा सत्कार करत गुहागर ग्रामपंचायतला विकास रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे गुहागर ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक दोन मध्ये मोहल्ला, ब्राह्मणवाडी, बाग या परिसरात समुद्राला भरती आली की या परिसरातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत समुद्राच्या भरतीचे पाणी जात होतं आणि पुढचे काही दिवस परिसरातील या नागरिकांना गढूळ आणि खारट पाणी प्यावे लागत होते. याचवेळी २५ लाखाचा निधी मंजूर करून आणत सतीश शेटे यांनी ते समुद्राचं खार पाणी त्या विहिरीपर्यंत पोहचू नये यासाठी बंधारा बांधला आणि हेच विशेष काम आजही अनेक ग्रामस्थ लक्षात ठेवून आहेत.
त्यामुळे भविष्यात यांना जर आपण नगरसेवक पदी जर निवडून दिले तर या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास होईल असा आत्मविश्वास नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत नागरिक आपल्या पाठीशी असून विजय आपलाच होणार असल्याचे सतीश शेटे यांनी सांगितले. गुहागर शहराचा विकास आराखडा मधील रस्ता रुंदीकरण यामुळे येथील घरे ,मंदिरे तुटली जाऊ शकतात याचा विचार येथील माझ्यासमोर उभे असलेल्या व पाच वर्षे नगरसेवक म्हणून असलेल्या उमेदवाराने केले नसल्याचे शेटे यांनी सांगितले.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.