loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणच्या आवाजाला राजकीय दखल, पण आता कृती हवी!

खेड -लोटे : लक्ष्मी कंपनीविरोधात कोकणात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल अखेर राज्य पातळीवर घेतली जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सकपाळ आणि आमदार भाई जगताप यांनी आंदोलन स्थळी भेट देत कोकण नागरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. ही भेट केवळ औपचारिक न राहता कोकणच्या जनतेच्या वेदना आणि भीती समजून घेण्याचा प्रयत्न ठरला, ही अपेक्षा आहे. कारण हा संघर्ष कोणत्याही पक्षाचा नाही — हा माती, पाणी, शेती, मासेमारी आणि पुढच्या पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज आंदोलनकर्ते कडक उन्हात, मच्छरांच्या त्रासात, आरोग्याची पर्वा न करता बसले आहेत; पण सत्ताधारी यंत्रणा अजूनही कागदोपत्री आश्वासनांमध्ये अडकलेली दिसते. जर लोकप्रतिनिधी खरोखर जनतेचे प्रतिनिधी असतील, तर आता शब्द नव्हे तर ठोस भूमिका आणि स्पष्ट निर्णय अपेक्षित आहेत. राजकीय पाठिंबा ही सुरुवात असते, विजय नाही. विजय तेव्हाच मिळतो जेव्हा जनता स्वतः जागी होते आणि एकजुटीने उभी राहते. आज प्रश्न एका कंपनीचा नाही, प्रश्न आहे — कोकण वाचणार की विषारी भविष्य स्वीकारणार? आता शांत बसण्याची वेळ संपली आहे.आवाज बुलंद करा… कारण लोकशाहीत अंतिम ताकद जनतेचीच असते!

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg