loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरीच्या वतीने देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण

मंडणगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसेवा सप्ताह’ अभियानांतर्गत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने मंडणगड तालुक्यातील देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष उदय घाग, चिपळूण तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैष्णवी राजेशिर्के, जिल्हा निमंत्रक समिती सदस्य गणपत गावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश घाग, दीपक गुरव, कृषी मित्र दीपक मोहिते, प्राध्यापक कुंडलिक यादव, अमित रसाळ, प्रशांत उगले, चांदणी शिगवण, रोशनी साखरकर, वैभव पाध्ये, योगेशकुमार केसरे, दत्तात्रय कदम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमित रसाळ यांनी मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg