सावंतवाडी, - स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी येथे शनिवार, दि. २५ जुलै २०२६, शनिवार रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून हा पवित्र सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या परिपाठाने झाली. यावेळी प्रशालेतील सहा. शिक्षिका चैताली वेर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीविषयी माहिती सांगितली. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, " ज्ञानोबा- तुकाराम, विठ्ठल... विठ्ठल..." नामघोष करत विठ्ठल भक्तीने भारावलेले सुंदर नृत्य सादर करून भक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेचा प्रत्यक्षात सुंदर अनुभव घेतला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या रंगीबेरंगी वारकरी वेशभूषेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. यामध्ये चैतन्या कोरगावकर हिने रुक्मिणी, तर समर्थ तेरेदेसाई याने भगवान विठ्ठल यांची वेशभूषा साकारून सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आरती केली. संपूर्ण विद्यालय परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. याच निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात "नाम घ्यावे आवडीने" हा अभंग सादर करून अभंग गायन सेवा अर्पण केली. विद्यार्थ्यांचे हे सादरीकरण अत्यंत सुरेल, शिस्तबद्ध आणि भावपूर्ण झाले. विद्यार्थ्यांना या अभंग गायनासाठी प्रशालेतील संगीत शिक्षिका सौ. ईश्वरी तेजम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेतील पखवाज शिक्षक संकेत म्हापणकर यांची या अभंगाला संगत लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक रुजुल पाटणकर तसेच मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे व उत्कृष्ट सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेतील संस्कार, भक्तीभाव आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे, भारतीय संस्कृतीची ओळख, भक्तीची अनुभूती आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवण घडविणारा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.



























































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.