आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली येथील इंग्लिश मीडियम स्कूल आबलोली या स्कूलमधील चिमुकल्या वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेषात आणि टाळ - मृदुंगाच्या गजरात पाऊले चालती पंढरीची वाट, विठ्ठल नामाचा जयघोष करीत आबलोली गावातून दिंडी काढली.हीच चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी लक्षवेधी ठरली असून गावकऱ्यांचे आकर्षण ठरली आहे. या वारकरी दिंडीत शौर्य संजय राठोड यांनी विठ्ठलाची तर श्रेया सचिन सोनवलकर, हर्षिता नरेंद्र रहाटे अद्विका विशाल राठोड यांनी रुक्मिणीची हुबेहुब वेशभूषा केली होती. आषाढी एकादशी निमित्ताने एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोली या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आबलोली गावातून इंग्लिश मीडियम स्कूल ते बाजारपेठेत चंद्रकला उद्योग समूह मैदान आणि पुढे विठ्ठल रुक्माई मंदिर व पुन्हा इंग्लिश मीडियम स्कूल अशी पायी वारकरी दिंडी काढण्यात आली.
यावेळी विठ्ठल रखुमाई नामाचा गजर दुमदुमला. चंद्रकला उद्योग समूह मैदान येथे शिक्षण महर्षी आणि माजी सभापती चंद्रकांतशेठ बाईत यांनी मौलिक मार्गदर्शन करून आषाढी एकादशीच्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. व उपस्थित सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिनशेठ बाईत, सेक्रेटरी स्नेहल सचिन बाईत यांनीही शुभेच्छा दिल्या.त्यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिरात या दिंडीचे जोरदार स्वागतही करण्यात आले सर्व वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले आणि प्रसादाचे सेवन केले यावेळी विठ्ठल रखुमाई प्रसादिक भजन मंडळाचे सेक्रेटरी अजित रेपाळ यांनी सर्वांचं स्वागत केलं.
यावेळी विठ्ठल रुक्माई प्रसादिक भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नेत्रा रहाटे, शर्मिष्ठा साळुंखे, दामोदर गोणबरे, शमीम मुल्ला, शितल सोनवलकर, प्रांजली शिगवण, कांबळे, तेजस केंबळे, निमिता धुमाळे, शर्मिला पवार यांनी विशेष प्रयत्न केले.



































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.