loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला मंडळ बालक मंदिरात उत्साहात साजरी झाली आषाढी एकादशी

वरवेली (गणेश किर्वे) - महिला मंडळ वळनाका संचालित चिपळूण,बालक मंदिर'च्या प्रांगणात नुकतीच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. चिमुरड्या बालगोपाळांच्या सहभागाने हा सोहळा अत्यंत मनमोहक ठरला. कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्षा सुमती जांभेकर तसेच स्मिता सैतवडेकर आणि कल्याणी सैतवडेकर पण होत्या, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षिका सोनाली जांगळी आणि त्यांच्या सहकारी नेहा जाधव आणि मिरा धामणस्कर यांनी पाहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वेशभूषेत आलेल्या चिमुरड्यांच्या आगमनाने झाली. या विशेष सोहळ्यात लहान मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत पांढरे धोतर, सदरा आणि टोपी परिधान करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच काही चिमुरड्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची वेशभूषा धारण केली होती. मुलींनी पारंपरिक वेषात डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन दिंडीच्या वातावरणाची अनुभूती दिली. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg