loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे येथील लिटिल चॅम्प्स स्कूलची आषाढी एकादशी निमित्त वारी उत्साहात

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे येथील लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेली "पारंपरिक वारी" उत्साहात पार पडली. शाळेच्या १४ व्या वर्षानिमित्त आयोजित या वारीची सुरुवात जानवळे फाटा येथून सुरू झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलमय झालेल्या वातावरणात लिटिल चॅम्प्स स्कूल च्या चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता, लहानग्या विद्यार्थ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व वातावरण विठ्ठलमय झाले होते. वारीचा पहिला विसावा कै.ह.भ.प. मोहन संसारे यांच्या कंपाऊंडमध्ये घेण्यात आला. यावेळी संसारे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्किटे व पाण्याचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संसारे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना विठ्ठल मूर्तीची प्रतिमा संस्थेतर्फे भेट देण्यात आली. यानंतर वारीचे पाहिले रिंगण शृंगारतळी बसस्टॉप येथे पार पडले. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून शृंगारतळी वासीयांचे व उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच शाळेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वारी नीलकंठेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा रिंगण सोहळा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नृत्यासोबत पालकांनीही उत्साहाने सहभाग घेत रिंगणाचा आनंद लुटला.

टाइम्स स्पेशल

रिंगण सोहळ्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नीलकंठेश्वर मंदिरात नेण्यात आले. नीलकंठेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे सर्वांना खिचडीचे वाटप करण्यात आले, तर रूपाराम देवासी यांनी विद्यार्थ्यांना लाडू वाटप केले. शाळेतर्फे चॉकलेट व खाऊ चे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंतिम संसारे यांनी केले. तसेच या संपूर्ण दिंडी कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विश्वास बेलवलकर, जय गुहागरकर, संदीप मांडवकर, मंगेश कोंडविलकर, उमेश खैर, रूपाराम देवासी, नीलकंठेश्वर मंदिराचे सदस्य दादा वेल्हाळ, कोळवणकर आणि अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांचा उत्साह, समस्त शिक्षक वृंद, पालकांचा सहभाग आणि समाजातील मान्यवरांचे सहकार्य यामुळे ही वारी संस्मरणीय ठरली. शेवटी आनंदाच्या वातावरणात वारीची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg